भक्तांसी सान न धरीच
258.
भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥
उच्छिष्टांची आस धरुनिया जीवी । गोकुळी ते दावी चोज सर्व ॥२॥
खेळे विटिदांडु हमामा हुंबरी । वाजवी मोहरी सवंगडियासी ॥३॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकित । म्हणोनि तिष्ठत उभा असे ॥४॥
