अस्तमान जालिया ग्राम
263.
अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरी ॥१॥
आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केले निंबलोण ॥२॥
षड्रस पक्वान्नीं विस्तारिलें ताट । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥
नंदासवें जेवी वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्यांची ॥४॥
एका जनार्दनी ऐसी लीला खेळे । परब्रह्मा सांवळे कृष्णरुप ॥५॥
