वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

गौळणी ठकविल्या | गौळ

🙏 4. संत नामदेव · ABH-090294 · अभंग क्र. २६३

263.
गौळणी ठकविल्या | गौळणी ठकविल्या |एक एक संगतीने | मराठी कानडीया |एक मुसलमानी | कोंकणी गुजरणी |अशा पांचींजणी गौळणी ठकविल्या ॥ ध्रु॥गौळणी सुंदरी | गौळणी सुंदरी |गेल्या यमुनेतीरी | वस्त्रे फेडुनिया स्नान करिती नारी |गोविदाने वस्त्रे | नेली कळंबावरी |स्तान करोनिया | त्या आल्या बाहेरी ॥१॥
लडोबा गोविदा | लडोबा गोविदा |निर्वाणी आज | आडचाल्लो पडचाल्लो |शिर फोड्या न कोडो | मारी कन्हय्या |पानी खेळ्या न खेळो ॥२॥
देखरे कन्हय्या देखरे कन्हय्या | मै इज्यतकी बडी |कदम पकडूंगी | मैया कुटोजुडी |मेरी चुनरी दे | मेरी ले दुल्लडी ॥३॥
देवकी नंदना | देवकी नंदना |तू एक श्रीपती | उघडी हिवाची | तुज विनवु किती |पाया पडत्ये बा | मी येत्ये काकुळती |माझी साडी दे | घे नाकाचे मोती ॥४॥
|पावगा दातारा | पावगा दातारा | तू नंदाचा झिलो |माका फडको दी ! मी हिवान मेलो |घे माझे कोयतो | देव पाया पडलो ॥५॥
ज्योरे माधवजी ज्योरे माधवजी | मे शरण थई |तनका काकैपी | बाप दयाळ तूही |मारी साडी अपो | हातणी ले कंकणी ॥६॥
इतुके ऐकोनी | इतुके ऐकोनी | देव बोले हांसोनी |सूर्या दंडवत करा कर जोडोनी | नामा विनवितो |म्हणे शारंगपाणी | गौळ्या ऐक तू | धन्य तुझी करणी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग