देवकी बंधमुक्तता - अ
267.
देवकी बंधमुक्तता - अभंग २६७ ते २७१
कपटे पयपानसी । मोहे मोहनराशी । विषयी विष स्तनासी । देवो आली ॥१॥
तंव तो सावध निजमुखी । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥
स्वरुपी घडोघडीं । म्हणे बापा सोंडीं । कृष्णमुखीं कुडी । सरती झाली बा ॥३॥
योगियां न कळे चित्ती । सिद्धा दुर्लभ प्राप्ती । अंतीं कृष्णमुर्ती । हृदयावरी बा ॥४॥
पाजु आली विष । तियेसी परमसुख । कृष्णभजनीं दुःख । कवणा नाही बा ॥५॥
भक्ता परम प्राप्ती । द्वेषियां तेचि गती । एका जनार्दनी प्रीति । वैरियां चार्ही मुक्ति बा ॥६॥
