लिहिले संचिती न चुके
265.
लिहिले संचिती न चुके कल्पांती । वाया कुंथाकुंथी करूनी काय ॥१॥
जन्ममरण सुखदु:खाचे गांठोडे । हे तो मागे पुढे बांधलेंसे ॥२॥
निढळींची अक्षरे साच तेचि खरे । आता वोरबार करील कोण ॥३॥
चोखा म्हणे आमुची जैशी का वासना । तैशीच भावना होत जात ॥४॥
