वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

सरलिया खेळा गे म्हणत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089754 · अभंग क्र. २६४

264.
सरलिया खेळा गे म्हणती अवघ्या बाळा ।
आरते आरती करु नंदाच्या गोवळा ॥१॥
हाचि जीव प्राण सोयरा सज्जन ।
ओवाळिता यासि बाई निवे तनुमन ॥२॥
करुनिया आरती पंचप्राण ज्योती ।
मिळोनिया सकळा बाळा श्रीमुख पाहाती ॥३॥
निळा म्हणे वेगळे धन्य पर्वकाळ ।
साधला हा आजि येथे आळवू गोपाळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग