आता म्हणो जरी ब्राह्
259.
आता म्हणो जरी ब्राह्मण पंडिता ।
न माने तत्त्वता मना तेही ॥१॥
जाणता विवेक निवडी तो बरा ।
ब्राह्मण तो खरा ज्ञानवंत ॥२॥
क्षेत्री वैश्य शूद्र ब्राह्मणादि सर्व ।
पांडित्य अपूर्व करिती अवघे ॥३॥
पद-पदार्थांचे करिती विवरण ।
सर्व वर्ण जाणे काव्यअर्थ ॥४॥
अविंधादिक ही करिती पांडित्य ।
ब्राह्मण या तथ्य कोण म्हणे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे वोळखावे जनी ।
ब्राह्मण निर्वाणी कोण ऐसे ॥६॥
