सुख श्रृंगार सुहावा
259.
सुख श्रृंगार सुहावा । मिरवतो हरि समाधाना बोधु रे ॥
हरींचे सुख गीति गाता । समाधान बोधु रे ॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु रे । आठविता समाधान बोधु रे ॥
अर्थ :
हरिची प्राप्ती व त्याचे समाधान हाच अलंकार माझ्या अंगावर शोभत आहे. व हरीप्राप्तिपासून झालेले सुखसमाधान गात रहावे असे मला वाटते. ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाचे स्मरण करण्यातच सुखसमाधान आहे असे माऊली सांगतात.
