गुणात असोनी गुणांसी
265.
गुणात असोनी गुणांसी नातळे ।
क्रियेसी नाकळे अणुमात्र ॥१॥
तोचि रे ब्राह्मण वोळखावा जनी ।
द्वैत जया स्वप्नी आडळेना ॥२॥
षडूर्मीरहित षड्भावा नातळे ।
दोषांचेनि मेळे सापडेना ॥३॥
बहेणि म्हणे सत्य न संडी सर्वथा ।
ब्राह्मण तत्त्वता तोचि एक ॥४॥
