वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आता ‘ याती’ लागी म्ह

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075853 · अभंग क्र. २५८

258.
आता ‘ याती’ लागी म्हणावे ब्राह्मण ।
तरी ते निर्वाण नये चित्ता ॥१॥
निरसूनी सर्वही विचारा वेदाते ।
उरे ते आइते वोळखावे ॥२॥
ऋषी श्रृंगी झाला मृगाचिये पोटी ।
गौतम शेवटी कुशास्तरणी ॥३॥
जंबुक ऋषि तो जन्मला जांभुळी ।
वाल्मीकीची कुळी वारूळी ते ॥४॥
कैवर्तकी-पोटी व्यास तो जन्मला ।
विश्वामित्र जाला क्षेत्रणीचा ॥५॥
वसिष्ठाचा जन्म उर्वशी-उदरी ।
अगस्ति निर्धारी कलशोद्भव ॥६॥
नारद प्रसिद्ध ठाउका सर्वांसी ।
दासी ते तयासी प्रसवली ॥७॥
बहेणि म्हणे जाति नव्हेचि ब्राह्मण ।
ब्राह्मण्याची खूण वेगळीच ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग