वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 12. कृष्ण जन्म

एकच टाळी झाली चंद्रभ

🙏 16. संत जनाबाई · ABH-090289 · अभंग क्र. २६६

266.
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी ॥1॥ नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥2॥ अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला । प्रेमाचेनि छंदे विठ्‌ठल नाचु लागला ॥3॥ नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥4॥ साधु या संतांनी देवाला धरिला मनगटी । काय झाले म्हणुनी दचकले जगजेठी ॥5॥ ऐसा कीर्तन महिमा सर्वामाजी वरिष्‍ठ । जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥6॥ नामयाची जनी लोळे संताच्या पायी । कीर्तन प्रेमरस अखंड देई गे विठाई ॥7॥.
 

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग