वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

चातकाचे जिवन घनु । त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074738 · अभंग क्र. २५८

258.
चातकाचे जिवन घनु । तरी तो साये एकाधिनु ।
आला वेळु भुलावणु । जैसा नलिनिसी नाही भानु ॥
चंद्रासवे चकोर मिळोनिया पूर्णिमेसी विरोधु मांडिला ।
तो योग दुर्मिळ म्हणोनी तो प्रसंगु विपाईला वेळा रया ॥
तैसे माणुसपण सहज तनुवरी देवाचा वारा स्वाधिनु ।
तैसा बापरखुमाविवरू विठ्ठलु न विसंबावा एकु क्षणु ॥

अर्थ :
चातकाला पाणी म्हणजे फक्त मेघांतून पडेल तेच असते. पण तो योग विरळच असतो. तसेच सूर्यविकासिनी कमलिनीला सूर्याचा योग क्वचित येतो. चकोरांना पौर्णिमेच्या चंद्राचा योग क्वचित येतो. तसा मनुष्य जन्म मिळाण्याचा योग क्वचितच येतो. असा हा दुर्लभ मनुष्य जन्म तुला प्राप्त झाला आहे. अशा वेळ माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे चिंतन करण्यात एका क्षणाचा देखील विलंब करू नको.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग