घागरिया छंदे चरण घवघ
259.
घागरिया छंदे चरण घवघवी | अरुणा दाखवी चरणतळी ॥१॥
असता येई कान्हा देई आलिंगन | उतरी निंबलोण मुखावरूनि ॥२॥
वाघनखे कडदोरा कंठी घालूनि सरी | झणी तुज मुरारी दृष्टी लागो ॥३॥
अंबुले लोळिया कंठी रिठे गांठी | छंदे जगजेठी हालवी मान ॥४॥
भाळी चंदन वरी मसीचा टिळकला | झणी तुज गोपाळा दृष्टी लागे ॥५॥
नामयाचा स्वामी हरी माझे चित्त | सर्व छंदे गीत गाऊ नाचू ॥६॥
