वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

लांचावले ब्रह्म भक्त

🙏 4. संत नामदेव · ABH-083036 · अभंग क्र. २६४

264.
लांचावले ब्रह्म भक्तीचेनि सुख |ते गोकुळी गोपाळवेषे गाई राखे ॥१॥
त्रिभुवनी न समाये ब्रह्मादिकी लक्षा नये |ते दास्यत्व करिताहे गौळीयांचे ॥२॥
नवलाव गे माये देखियला |ते सुख काय सांगो तुला ॥३॥
कसे गोवळेपणांची बुंथी घेऊनिया साजिरा |परब्रह्म जालेंसे पिसे गे माये ॥४॥
निगमा निर्धारिता अमरा दर्शनाची आस |मुनिजता ध्यानी आभास तोही नाही ॥५॥
ते हे. नित्य पूर्ण खेळविती गौळणी |चुंबन देउनी हृदयी आलिंगिती ॥६॥
क्षीरसागरीचे सुख सांडुनी अद्दोष |लक्षुमी सेजेचे विलास तेहि नावडती ॥७॥
ते हे गोधना गोठणी लोळे शुद्ध चैतन्य सांवळे |ते सुखही न कळे साचे चतुरानना ॥८॥
भक्ती प्रेम भाव देखे आहे जेथे |हरी ओरसला जाये तेथे कैचे नैश्वरत्व ॥९॥
|न विचारी जातीकूळ शुची अथवा चांडाळ |हृदय देखुनी निर्मळ प्रीति धरी तेथे ॥१०॥
ऐसे त्रिभुवन सुखाचे सार की अनाथाचे माहेर |अव्यक्त परि साकार जाले असे ते ॥११॥
भक्‍ताचेनि वियोगे श्रमले म्हणोनि गोकुळासी आले |तेणे प्रेम सुख दिधले नामयासी ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग