वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

खेळ खेळ झेंपा गे आठव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089728 · अभंग क्र. २५७

257.
खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा ।
नाहिंतरि पुन:पुन्हा न चुकति खेपा ॥१॥
घेई बारवोटी गे काढी सागरगोटी ।
जेणे अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटी ॥२॥
बरवि घालि झेंप गे लांबउनि हात ।
नाहिं तरी लाजोनिया आयुष्या करिसि घात ॥३॥
निळा म्हणे डोले गे हरीचिया तोले ।
जेणे इहपरलोकी विकसिल मोले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग