आता उरले ते मत । तेथ
2306.
आता उरले ते मत । तेथे वस्तु सदोदित । त्यासी नाही अंत । कवणे काळी ॥१॥
महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं ते घर । ब्रह्माडीचें ॥२॥
तेथे नाही काळ । त्यासी नाही वेळ । उत्तम स्थळ । पवित्र असे ॥३॥
प्रभा आणि ज्योति । रत्न आणि दीप्ती । किरण आणि गभास्ती । एकरुप ॥४॥
तैसी वस्तु आणी ईश्वर । एक पै प्रकार । पृथ्वी अंबर । दोन्ही एक ॥५॥
तैशा शरीरा ज्योति । आदिमध्य अंतीं । वस्तु ते तत्त्वार्थीं । भरली असे ॥६॥
देह जावो अथवा राहो । आम्ही वस्तुचि आहो । एक जनार्दनी भावों । दृढ झालिया ॥७॥
