वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

शुद्ध ब्रह्माज्ञानाच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086279 · अभंग क्र. २३२५

2325.
शुद्ध ब्रह्माज्ञानाचा धडा । पंचभूतांचा खचला खडा । देह चतुष्टय पुसिला वाडा । धन्य धडफुडा आत्मा मी ॥१॥
शुद्धब्रह्माज्ञानाचा मार्ग । मृत्यु पातला सरलें सर्ग । पिंड ब्रह्माडाचें दुर्ग ब्रह्मांडाचें दुर्ग । विरोनी अर्व आत्मा मी ॥२॥
ॐ नमो जी जगदगुरु । सर्वांभुती साक्षात्कारु । ब्रह्मा विष्णु महेश्वर । ॐकार तो वोळखिजे ॥३॥
अनंत ब्रह्मांडाचा टिळा । लावुनी बैसे ब्रह्माकपाळा । त्यांतही वळी तरंग जळा । वरी तेविं ब्रह्मांड ॥४॥
ऐशा अनंत विभूती । दिगंबर अंगी चर्चिती । घडीनें घडी लेप देती । पुसोनी जाती क्षणक्षणां ॥५॥
तैसे नव इंद्रियां सबाह्म । ब्रह्मा कोंदलें अनुभव पाहे । घट जळी बुडोनी राहे । ऐसा आहे दृष्टांन्त ॥६॥
गगन ग्रासोनी अपार । तैसा मी आहे सर्वेश्वर । अनंत ब्रह्मांडो अवतार । तरंग फिर मजवरी ॥७॥
तुम्हांआम्हा मध्ये जे अवकाश । ते सबाह्म ब्रह्मा सावकाश । अनंत ब्रह्मांडें फुटती तयास । निराभास निगुण ॥८॥
हे ब्रह्मा हे माया । का बोट लावुनी दाखवु शिष्यराया । आधारापासोनी सहस्त्रदळ काया । बुडे ठाया ते ब्रह्मा ॥९॥
ब्रह्मा म्हणजे आकाश । की ब्रह्मा म्हणजे महदाकाश । की ब्रह्मा म्हणजे निर्गुण निराभास । आदि अवकाश ते ब्रह्मा ॥१०॥
ब्रह्मा म्हणजे ते पोकळ । की ब्रह्मा म्हणजे आकाशहुन पातळ । की ब्रह्मा म्हणजे शुन्य सकळ । मिथ्या मूळ ते ब्रह्मा ॥११॥
सोहं नाद सर्वांसी । विश्वनाथ विश्वासी । अमृतफळ अंबियासी । लक्ष चौर्‍यायंशीं लोंबती ॥१२॥
तैसे जन फळ जनार्दनी लोंबे । सोहं देठ दोहींकडे झोंबे । फळ दे वृक्ष लोंबें । अद्वैत बिंबलें एका जनार्दनी ॥१३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग