दाटे कंठ लागे डोळिया
2319.
दाटे कंठ लागे डोळिया पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥
तेणे सुखे छंदे घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्या ॥धृपद॥
तुझ्या मोहे पडो मागील विसर । आलापे सुस्वर करिन कंठ ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे सौरस । तुम्हाविण रस गोड नव्हे ॥३॥
अर्थ :
देवा तुझे गुण गाताना माझा कंठ दाटून येवो, डोळ्यातून आनंदाश्रूचा पाझर फुटो व तुझ्यावर अपार गुणाची वृष्टी मी करो. मग मी तुझ्या प्रेमसुखाच्या आनंदाचा सोहंळा भोगीन व पाप पुण्या पेक्षा वेगळा होऊन राहील. देवा तुझ्या मोहाने मागील सर्व गोष्टीचा मला आता विसर पडो मग मी तुझ्या अपार गुण वर्णनाच्या अलापाणे माझा कंठ सुस्वर करील. तुकाराम महाराज म्हणतात देवा पण येथे तुझे प्रेम मला मिळाले पाहिजे कारण तुझ्या प्रेमावाचून भक्तिरस गोड होत नाही.
