ब्राह्मण क्षत्रिय वै
2327.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण चारी । हे स्थान मान निर्धारी तो मी ॥१॥
ब्रह्माचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ । आश्रम धर्मक समस्त नेव्हे मी ॥२॥
बावन मात्रा चौदा चक्रें सहा शत एकवेस हजार । स्थान मान पवित्र नाही मज ॥३॥
स्थूळ सुक्ष्म कारण महाकारणाचे ज्ञान । चहुं देहाचें बंधन नाही मज ॥४॥
सोहं सोहं दोन्हींक वेगळा यापासुनीं । चहुं मुद्रेंचे ध्यानीं नाही गा मी ॥५॥
या सकळाते जाणता विरळा पै पाहता । एका जनार्दनी तत्त्वता निजबोध तो मी ॥६॥
