वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

पाहाता ठायाठाव । जात

🙏 3. संत तुकाराम · ABH-077847 · अभंग क्र. २३५२

2352.
पाहाता ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥
नये वाटो गुणदोषी । मना जतन येविशी ॥धृपद॥
त्रिविधदेह परिचारा । जनी जनार्दन खरा ॥२॥
तुका म्हणे धीरे । विण कैसे होते बरे ॥३॥

अर्थ :
जर आपण या जगामध्ये काय वाईट, काय चांगले, कोणते स्थळ चांगले, कोणते स्थळ वाईट हे जर पाहत बसलो तर देव आपल्यापासून अंतरतो. मनामध्ये कोणाविषयीही वाईट गुणदोष येऊ देऊ नये याविषयी मनाला सांभाळावे. सर्वांच्या देहामध्ये राजस, तामस, सात्विक हे तीन गुण आहेत परंतु असे असून देखील सर्वांच्या देहामध्ये जनार्दन हा आहे व तोच खरा आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच कोणातही गुणदोष आपण पाहिला तरी धीर धरावा आणि जर आपण धीर धरला नाही तर आपले बरे तरी कसे होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग