वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

विष्णुदासा भोग । जरी

🙏 3. संत तुकाराम · ABH-078275 · अभंग क्र. २३३४

2334.
विष्णुदासा भोग । जरी आम्हा पीडी रोग ॥१॥
तरि हे दिसे लाजिरवाणे । काय तुम्हासी सांगणे ॥धृपद॥
आम्हा काळे खावे । बोलिले ते वाया जावे ॥२॥
तुका म्हणे दास । आम्ही भोगू गर्भवास ॥३॥

अर्थ :
देवा विष्णुदासांना विविध प्रकारचे भोग त्रास आणि रोग होऊ लागलेत, देवा तुमचे वागने हे लाजिरवाणे दिसेल आणि हे तुम्हाला सांगावे लागेल काय? आम्हाला काळाने खावे आणि आम्ही बोललेले वाया जावे तर, तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमचे दास असून देखील आम्ही गर्भवास तर भोगू परंतु तुम्हाला हे चांगले दिसणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग