मृगजळाचें दोही निःशे
2344.
मृगजळाचें दोही निःशेष जळ नाही । यापरी माया समूळ मिथ्या पाही ॥१॥
माया नाही माया नाही । जगचि ब्रह्मारुप पाही ॥२॥
दोराचें सर्पत्व जिताचि मेले । मायोची बद्धता तुजचि तुझेनि बोले ॥३॥
एका जनार्दनी पाहता चैतन्यघन । बद्धता मुक्तता समुळ मिथ्या जाण ॥४॥
