सक्षत्वे जीत त्याचा
2308.
सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारे मुरत वस्तुमाजीं ॥१॥
पिंडीचें ते दोन्ही ब्रह्माडींचे दोन्ही । हे प्रळय पुराणीं बोलिलेती ॥२॥
प्रळय आत्यांतिक जेथे संहारत । विवेक आपणचि येत सर्वाठायीं ॥३॥
मग प्रचीत सहज बरवे वाईट वोज । निपजे तेथे दुजे भाव नाही ॥४॥
एका जनार्दनी भला आपणचि ईश्वर झाला । तो भरुनी उरला साक्षत्वेंसी ॥५॥
