निरसुनी ज्ञान महविती
2309.
निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझे ॥१॥
पिंड आणि ब्रह्मांड म्हणिजे अखम्ड । याहुनी उदंड स्वरुप माझे ॥२॥
माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्व । सत्वाचें निज सत्व स्वरुप माझे ॥३॥
सद आणी चिद म्हणती आनंद । त्याहुनी अभेद स्वरुप माझे ॥४॥
एका जनार्दनी एकपणातीत । चित्ताचें अचिंत्य स्वरुप माझे ॥५॥
