वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

त्रिविधकर्माचे वेगळा

🙏 3. संत तुकाराम · ABH-078097 · अभंग क्र. २३०६

2306.
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले ॥१॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संता अंगी ॥धृपद॥
हिशेबे आले ते सकळांसी प्रमाण । तेथे नाही आन चालो येत ॥२॥
तुका म्हणे नाही पापपुण्य खती । झाड्याची हुजती हाता आली ॥३॥

अर्थ :
आपल्या शास्त्रात कर्माचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक, राजस, तामस आणि त्यांचे तीन प्रकार पडतात ते म्हणजे इष्ट-अनिष्ट आणि इष्टा, निष्ट ही तीन वेगवेगळे फळे वेगवेगळी करून दाखवलेले आहेत. आलेले भोग मी भोगतो आणि जे संचित कर्मामुळे राहिलेले भोग आहेत ते मी संता वर सोपवून सुखाचा गौरव भोगत राहतो. जे हिशोबाने चालत आले आहे ते सर्वांना मान्य आहे तेथे कोणाचे काही चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता संतांच्या कृपेने माझ्या सर्व संचित कर्माचा हिशोब पूर्ण झाला असून त्याची पावतीही माझ्या हाती आली आहे त्यामुळे मला पाप पुण्याची आता खंत राहिली नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग