वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

दर्शनाचे आर्त जीवा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077881 · अभंग क्र. २३१६

2316.
दर्शनाचे आर्त जीवा । बहु देवा राहिले ॥१॥
आता जाणसी ते करी । विश्वंभरी काय उणे ॥धृपद॥
येथे जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥
तुका म्हणे जाणवले । आम्हा भले एवढेंच ॥३॥

अर्थ :
देवा तुमच्या दर्शनाचीच उत्कट इच्छा तेवढी माझ्या मनात राहिली आहे. हे विश्वंभरा आता माझ्या अंतरंगातील इच्छा जाणून घ्या व ती पूर्ण करा, ती पूर्ण होऊ शकणार नाही अशी कोणती उणीव तुमच्यात आहे? जर आमच्या अंतरंगात काही चिंता राहिली असेल तर ती चिंता दूर करणारा इथे तुझ्या वाचून दुसरा कोण दाता आहे? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुच आमची चिंता दूर करू शकणारा आहेस व आमची इच्छा पूर्ण करणारा आहेस हे आम्हाला चांगले जाणवले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग