वेदवचने सुतक पावे ।
2322.
वेदवचने सुतक पावे । ब्रह्मा म्हणता ब्रह्म नव्हे ॥१॥
वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥
सकळ ब्रह्मा पै अद्वैत । वेद परीसोनी ना तुटे द्वैत ॥३॥
श्रुति सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ॥४॥
संकल्प नाशी तो संन्यासी । तेथे तो कल्पना कायसी ॥५॥
