देही कैंचे सुख कैंचे
2339.
देही कैंचे सुख कैंचे दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥
देही कोण देव कोण । भक्त कोण शांत कोण अशांत ॥२॥
देही कैंची क्रिया कैंचें कर्म । देही विरालें धर्माधर्म ॥३॥
देही कैचें शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धि कैंचा बोध ॥४॥
एका जनार्दनी देह । ब्रह्मी ब्रह्मा होत आहे. ॥५॥
