वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

सत्यत्वेंशी घेणे भक्

🙏 3. संत तुकाराम · ABH-078321 · अभंग क्र. २३४४

2344.
सत्यत्वेंशी घेणे भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसे ॥१॥
मग ते अवीट न भंगे साचारे । पावले विस्तारे फिरो नेणे ॥धृपद॥
वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभये करे दास सत्य तई ॥२॥
तुका म्हणे आधी न करी तांतडी । पायी जाली जोडी तेणे शुद्ध ॥३॥

अर्थ :
भक्ताने एकदा तरी सत्य भक्तीचा अनुभव घ्यावा आणि माझ्या स्वामी कडून त्याचा गौरव व्हावा अशीच मी इच्छा करत आहे. सत्य भक्तीचा अनुभव हा अवीट असतो न भांगनारा असतो त्याचा एकदा की विस्तार झाला व खऱ्या भक्तीचे भक्ताला ज्ञान झाले की तो आपले पावले पुन्हा केव्हाही प्रपंचाकडे फिरू देत नाही. केवळ वाणीने भक्तीचा जो गौरव सांगतो त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही ज्याच्या मस्तकावर माझ्या स्वामींचा अभय हस्त असेल तोच खरा भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी शुद्ध भक्त आहे असे आधीच म्हणून घेण्याची तातडी करू नये तर खरा भक्त तेव्हाच होतो जेव्हा त्याला देवाच्या पायाचा लाभ होतो दर्शन होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग