वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

निरालंब सहज माय पहात

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086372 · अभंग क्र. २३२०

2320.
निरालंब सहज माय पहाता कैसे । सबाह्म अभ्यंतर व्यापुनी पुर्ण अखंड दिसे ।
लक्ष वो अलक्ष पाहता देही देह न दिसे । निर्गुण गुणसी आले अवघे ब्रह्माचि दिसे ॥१॥
ऐसा हा व्यापकु हरि आहे सर्वांठायीं । ज्ञानांजन लेऊनि पाहे देहींच्या देहीं॥धृ०॥
पिंड ब्रह्मांड व्यापुनी अतीत कैसा । आदि अंत ज्याचा न कळे श्रुति मुरडल्या कैशा ।
नेति नेति शब्द बोलती हरि अगाध ऐसा । म्हणवोनि गुरुमुखे दृढ विश्वास धरी ऐसा ॥२॥
प्रसिद्ध आत्मा देखोनि विराले मन । मनचि उन्मन जाले तेथे कैचें ज्ञान ।
ज्ञान ध्यान हेंहि न कळे अवघा जनार्दन । एका जनार्दनी शरण । कायावाचामनें जाण ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग