का जी माझे जीवी । आळ
2315.
का जी माझे जीवी । आळस ठेविला गोसावी ॥१॥
येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥धृपद॥
देहआत्म वादी । केला घात कुबुद्धी ॥२॥
तुका म्हणे मन । कळवटी वाटे सीण ॥३॥
अर्थ :
अहो माझे स्वामी तुम्ही माझ्या जीवा मध्ये येवढा आळस का बरे ठेवला आहे? या आळसामुळे सगळ्यात मोठा घात होतो आहे यापेक्षा मी दुसरा कोणता घात मानू की, मला तुमच्या चिंतनासाठी वेळ मिळत नाही तुमच्या चिंतनात मला अंतर पडते आहे. मी देहालाच आत्मा समजत बसलो आणि माझ्या कु-बुद्धीनेच माझा घात केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा हा आळस आणि कु-बुद्धी माझ्या जीवातून केव्हा जाईल याविषयी माझ्या मनाला काळजी वाटत आहे व मला दुःख वाटत आहे.
