मी ब्रह्मा जाहलों म्
2324.
मी ब्रह्मा जाहलों म्हणे अंतरी ब्रह्मा नव्हे ऐसे कांही । ब्रह्माविण अनु न दिसे कोठे । तितुके ब्रह्मा पाही ॥१॥
होय नाही ऐसा संशयचि नाही निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाही तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥
वर्णाश्रमधर्म साचार मानुनी यथाविधी आचरती । स्वमताचा देही अभिमान धरुनी पृथक पृथक वाद करिती ॥३॥
पाषांडाच्या बळे होताती तोडागळे भेदे साचि हे अम्हीं ना हो म्हणती । सर्वदा तरी ब्रह्मा आहे ऐसे न कळे तयाप्रती ॥४॥
जळेंशी लवण वेगळे नाही जाण । तैसे आदिमध्य अंतीं ब्रह्माचि असे तेथे कैंचें न्युन पूर्ण ॥५॥
कर्ता कार्य कर्म अभिन्न तेथे बद्ध आणि मुक्त कवण । एका जनार्दनी ऐक्यपणें मुळींच नाही भिन्न ॥६॥
