अहा रे अभाग्या काय क
2340.
अहा रे अभाग्या काय केले । फुकट नरदेह गामविलें ॥१॥
भजें भजे रामकृष्ण वासुदेव । वाउगा सांडोनी देई हेवा ॥२॥
मुळ संकल्प तोडोनिया टाकीं । अहंकार ममता वासना उपाधि शेखी ॥३॥
एका जनार्दनी टाकुनी परता होय । वाचे सदा गाय वासुदेव ॥४॥
