वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

येणे मुखे तुझे वर्णी

🙏 3. संत तुकाराम · ABH-078120 · अभंग क्र. २३३०

2330.
येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम । तेचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनिया पाहे तुझे मुख । तेचि मज सुख देई देवा ॥धृपद॥
कान भरोनिया ऐके तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥
वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हे देई हातास पाया सुख ॥३॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतू यासी ॥४॥

अर्थ :
देवा मी माझ्या मुखाने तुझ्या रुपाचे, तुझ्या गुनाचे वर्णन कायम करेल असेच प्रेम मला तू द्यावे. देवा मी तुझे मुख डोळे भरून पाहिल असेच सुख मला द्यावे. देवा कान भरून तुझी कीर्ती ऐकेन अशीच विश्रांती मला द्यावी. मी तुझ्या नाम चिंतनाच्या आनंद रंगात टाळी वाजविण व देहाविषयी उदास होवून नाचेन हेच सुख माझ्या हाताला व पायाला तू द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा सर्व देह केवळ तुझेच चिंतन करील व तुझ्यावाचून इतर कोणाचेही चिंतन माझ्या मनात येऊ देऊ नकोस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग