वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

भगवद्भाव सर्वांभुती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086374 · अभंग क्र. २३२९

2329.
भगवद्भाव सर्वांभुती । हेंचि ज्ञान हेंचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नावें ॥१॥
हे सांडुनीं विषयध्यान । तेंचि मुख्यत्वे अज्ञान । जीवींजीवा बंधन । येनेंचि दृढ ॥२॥
आठव तो परब्रह्मा । नाठव तो भवभ्रम । दोहींचें निजवर्म । जाण बापा ॥३॥
आठव विसर चित्ती । जेणे जाणिजेती । तेचि एक निश्चिती । निजरुप ॥४॥
स्मरण तेचि निजमुक्ति । विस्मरण तेचि अधोगति । ऐसे पुराणे गर्जती । बाह्मा उभारुनी ॥५॥
एका जनार्दनी । सहज निजबोध मनी । सबाह्माभ्यंतरी । पूर्ण परमानंद ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग