पाचारिता धावे । ऐसी
2314.
पाचारिता धावे । ऐसी ठायीची हे सवे ॥१॥
बोले करुणा वचनी । करी कृपा लावी स्तनी ॥धृपद॥
जाणे कळवळा । भावसिद्धींचा सोहंळा ॥२॥
तुका म्हणे नाम । मागे मागे धावे प्रेम ॥३॥
अर्थ :
हरिभक्त वैष्णवांनी देवाला हाक मारली बोलवले की तो लगेच धावतच येतो ही त्याची मुळची सवय आहे. जो भक्त करुणेने हरीशी बोलतो त्या भक्तावर हरी कृपा करतो व त्याला आपल्या स्तनाला लावून प्रेम रुपी पान्हा पाजतो. हरी भक्तांच्या भावना जाणून घेतो व त्यांचा कळवळा जाणून त्यांना रिद्धी सिद्धी चा सोहंळा दाखवितो. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त हरीचे नाम घेतात त्यांच्या मागेमागे हरीचे प्रेम धावत असते.
