वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

धर्माचें वाट मोडे ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085997 · अभंग क्र. १७९०

1790.
धर्माचें वाट मोडे । अधर्माची शीग चढे । तै आम्हा येणे घडे । संसारस्थिती ॥१॥
आम्हा का ससारा येणे । हरिभक्ति नामस्मरणें । जडजीव उद्धरणें । नामस्मरणें करुनी ॥२॥
सर्व कर्म ब्रह्मास्थिती । प्रतिपादाव्या वेदोक्ती । हेंचि एक निश्चिती । कारण आम्हा ॥३॥
नाना मतें पाषांड । कर्मठता अति बंड । तयाचे ठेंगणें तोंड । हरिभजनें ॥४॥
विश्वरुप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी । भिन्नं भेदाची गोष्टी । बोलु नये ॥५॥
एका जनार्दनी । धरिती भेद मनी । दुर्‍हावले येथुनी । निंदक जाण ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग