माझिया मनेंसी केला म
1778.
माझिया मनेंसी केला म्या विचार | तब तेणे निर्धार सांगितला ॥१॥
मज नलगे मुक्ति नलगे ब्रह्मज्ञान | पायरी होईन पंढरिची ॥२॥
इंद्रिया मारिता येती काकुळती | तुजचि म्हणती ठायी ठायी ॥३॥
श्रवणी श्रवण करणे अखंड तुझी कीर्ति | विश्वविठ्ठलमूर्ति देखो डोळा ॥४॥
नामामृते रसना निवाली त्या सुखे | नाठवती दुःखे जन्मांतरींची ॥५॥
नामा म्हणे ऐसा कोण भाग्यहीन | जो धरी वासने वैकुंठींचे ॥६॥
