क्षण एक एकांती बैसोन
1782.
क्षण एक एकांती बैसोनि निवाडे | माग मज पुढे आवडे जे जे ॥१॥
सीणभाग आपुला सांगे पै वहिला | असेल जो वाटला मजविण ॥२॥
पुरवीन जीवींचे सर्व तुझे कोड | गगनाहुनि वाढ असेल जरी ॥३॥
वाटे माझे सर्व धावे तुझे हाती | नामरूपवृत्तिसहित मन ॥४॥
परी सर्वभावे तुझे उदासिन चित्त | उरले माझे आर्त कवण पुरवी ॥५॥
म्हणोनि पांडुरंग धरूनि हनुवटी | सांगे जिवींच्या गोष्टी नाम्याजवळी ॥६॥
