आम्हांसी ती मुख्य सं
१७७7.
आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचे गाऊ ॥१॥
दुजे नेणो स्वप्नीं विठ्ठल वांचुनीं । जनी मनी निरंजनी देखा हेंचि ॥२॥
संताचियां पायी मस्तक ठेवून । आवडी चरणा विठ्ठलांच्या ॥३॥
एका जनार्दनी जनार्दन एकपणी । विठ्ठला वाचूनीं दुजे नेणो ॥४॥
