वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

विचारिता सहज कोणी नव

🙏 4. संत नामदेव · ABH-082667 · अभंग क्र. १७८३

1783.
विचारिता सहज कोणी नव्हे माझे | दृढ चरण तुझे धरियेले ॥१॥
हेंचि माझे ज्ञान हाचि गुरुमंत्र | व्रत तप तीर्थ चरण तुझे ॥२॥
हेंचि माझे पुज्य हेंचि माझे पूजन | घ्याई तुझे चरण हृदयकमळी ॥३॥
हेंचि माझी क्रिया हेंचि माझे कर्म | हाचि माझा धर्म चरण तुझे ॥४॥
हानि परमानंद हेचि योगसिद्धी | लय लक्ष समाधि चरण तुझे ॥५॥
नामा म्हणे मने मानिला निर्धार | तरलो भवसागर याचीपरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग