वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

नाही भीड चाड बोलसी आ

🙏 4. संत नामदेव · ABH-082659 · अभंग क्र. १७६७

1767.
नाही भीड चाड बोलसी आगळे | तोंडाचेनि बळे अरे नाम्या ॥१॥
आपुलिया चाडे करितसा सेवा | आभारू का लावा आम्हांलागी ॥२॥
माझ्या ठायी काय मज उणे होते | माते देउनी सरते केले तुम्ही ॥३॥
निर्गुण निराकार होतो निजानंदे | त्यासी तुम्ही भेद केला देखा ॥४॥
संकल्प वासना नाना भजन मते | शुद्ध स्वरूपाते भेद जाला ॥५॥
वैकुंठ निजधामा सर्व सुखरासी | सांडोनी तुम्हांपासी येणे जाले ॥६॥
शेषाचे आरूवरी निद्रा क्षीरसागरी | सांडोनी वेषधारी जालो आम्ही ॥७॥
दाही अवतारी युगयुगांतरी | अनुष्ठान थोरी केली नाम्या ॥८॥
अवतारी कष्ट जाले थोर थोर | मारिले असुर तुम्हांलागी ॥९॥
नाना योनी दुःखे भोगा अनंत जन्मे | ते निरसली नाम माझ्या एका ॥१०॥
विषय भोगिता वरवी वास | मन केले उदास वैराग्येंसी ॥११॥
प्रपंची प्रज्वाळ अग्निचे कल्लोळ | सुखरूप सीतल आत्मज्ञाने ॥१२॥
माया हे दुस्तर नकळे इचा पार | ते नदी उतार केली तुम्हा ॥१३॥
कामक्रोधादिक षड्वैरी विकार | महा थोर थोर वश्य केले ॥१४॥
परदारा परधन परनिंदा परपीडा | दिधलिया झाडा दयाधर्मा ॥१५॥
ऐसे सर्वापरी म्या केले गोमटे | परी शब्द उफराटे न संडिसी ॥१६॥
रात्रंदिवस तुज लागला छंद | आम्हांसी विनोद करू ठासी ॥१७॥
अवघिया परिस तू जालासी धीट | बोलसी वोखट अमर्याद ॥१८॥
भक्तीचिया भोडा म्या बहु साहियेले | त्वा नाही पाहियेले मागेंपुढे ॥१९॥
जे आम्ही पेरिले तेंचि फळ आले | उफराटे जाले तुजवरी कृपा ॥२०॥
पहिलेचि चुकी पडियेली थोरी | तुझे अधिकारी जालो आम्ही ॥२१॥
खांदी बैसले ते नुतरे खालती | तैसे हे अमुते वोडवले ॥२२॥
सलगी खेळविता चुंबिता वदनी | देता टाकुनि मिठी घाली ॥२३॥
तुझा त्याग करिता कोपतील संत हांसती समर्थ पिसुन लोक ॥२४॥
सृष्टयादिका व्यापार राहिला परता | तुजसी बोलता न पुरे वेळ ॥२५॥
कांहींच न मागसी देतांहि न घेसी | अखंड जीवेंसी जडोनि ठेला ॥२६॥
वाढविता भक्ति तुज नाही तृप्ती | काय करिसी अंती न कळे मज ॥२७॥
मार्गे भक्त आम्ही बहुत देखिले | उठोनिया गेले क्षणामाजी ॥२८॥
अवतार अवतारी नव्हेसी परता | संबंध तुटता न दिसे तुझा ॥२९॥
नामा म्हणे देवा होई समाधान | परियेसी वचन एक माझे ॥३०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग