माझे मनी आनंद जाहला
1774.
माझे मनी आनंद जाहला । बोलता बोला नवजाय ॥१॥
एक संत जाणती खुण । येरा महिमान न कळे ॥२॥
हृदयींच उदय दिसे । लाविले पिसे देवानें ॥३॥
शरण एका जनार्दनी । करी विनवणी सलगीनें ॥४॥