वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

बोलविले जेणे । तोचि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080227 · अभंग क्र. १७९१

1791.
बोलविले जेणे । तोचि याचे गुह्य जाणे ॥१॥
मी तो काबाडाचा धनी । जेवू मागावे थिंकोनि ॥धृपद॥
मजुराच्या हाते । माप जाले गेले रिते ॥२॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥
मायबापासवे । बाळे कौतुके खेळावे ॥४॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनिया छंदा ॥५॥
त्याच्या साच गाई म्‍हैसी । येणे खेळावे मातीसी ॥६॥
तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥

अर्थ :
ज्या हरीने माझ्या मुखातून हे शब्द बोलवले आहे तोच त्या शब्दाचाअर्थ : जाणतो आहे. मला केवळ देवाने निरोप सांगायचे काम सांगितले आहे मी ओझे वाहण्याचा धनी आहे आणि जसे लहान मूल रडते व रडून पडून आईला जेवण मागते त्याप्रमाणे मी देवाला जेवण मागत आहे. मी तर केवळ देवाचा मजूर आहे एकदा की मालकाने सांगीतले की ही वस्तू तिथे नेऊन ठेव की मी केवळ ती वस्तू तिथे नेऊन ठेवणार एकदा ते काम झाले तर मापही मोकळे होते आणि मजूरही मोकळा होतो. माझे सर्व इच्छा पूर्ण करणारा पिता माझा पांडुरंग आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर कौतुकाने खेळ खेळते त्याप्रमाणे आम्ही या हरीबरोबर भक्तीचा खेळ कौतुकाने खेळतो. ज्याप्रमाणे आई वडील जसा धंदा करतात तसा छंद मुलांनाही लागतोच. जसे आई-वडिलांच्या प्रपंचातील गाई म्हशी असतात तसे मुले मातीची गाई म्हशी करून खेळतात. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही बोलत आहे ते मी बोलत नसून प्रत्यक्ष विठ्ठलच बोलतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग