वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

ऐकोनि संतकीर्ति । मन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086036 · अभंग क्र. १७८७

1787.
ऐकोनि संतकीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाही पुनरावृत्ती । जन्माची तया ॥१॥
धन्य धन्य संतजन । मज केले वो पावन । विश्रांतीचे स्थान । हृदयी माझ्या ठसविलें ॥२॥
बहु जाचलों संसारे । बहु जन्म केले फेरे । ते चुकविले सारे । आजी कृपा करुनी ॥३॥
शरण एका जनार्दनी । माझे हरिले मीपण । तुम्ही कृपा करुन । अभय वर दिधला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग