महाद्वारी सुख असे या
1786.
महाद्वारी सुख असे या सुखाचे | लागती संतांचे चरणरज ॥१॥
म्हणोनिया स्थळ पाहिले निवांत | जाले चित्त तेथे समाधान ॥२॥
सकळ वैष्णवांसहित बोळवण करा | तुम्ही हो दातारा मजलागी ॥३॥
देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी पुरतील अंतरी कोड तुझे ॥४॥
