मोकळें ते मन ठेविले
1769.
मोकळें ते मन ठेविले बांधोनी । जनार्दनचरणीं सर्वभावे ॥१॥
स्थिर मति जाली वार्ता तीही गेली । द्वैताची फिटली सर्वसत्ता ॥२॥
मोह आशाबद्ध कमी निवारली । पावन तो जालो संतचरणी ॥३॥
एका जनार्दनी धन्य संतसेवा । उगविला गोंवा गुंती सर्व ॥४॥
