केशव म्हणे नामयासी |
1795.
केशव म्हणे नामयासी | ज तू दूरी धरिला होतासी |ते तू काकुळती भाकिसी | मजलागी हिडसी दाही दिशा ॥१॥
तुझे गाहाणे सांगो संतापाशी | तीहि तुज सरते केले भक्तीसी |मी तंब वंद्य तीहि लोकांसी | त्वा तव मजसी प्रजियेले ॥२॥
आमुची वर्मे कर्मे बोलतोसी | सलगी करूनि फार जातोसी |उंच पदवी दिल्या पाइकासी | तरी काय स्वामिसी भिऊ नये ॥३॥
मी विश्वासलो तुझिया भावासी | परि तू शब्देहि न पुससी |म्या तंव अमृतदृष्टी पाहिलासी | अढळपदासी दावियेले ॥४॥
मी तंब वंद्य त्रिभुवनासी | श्रुति स्मृति आगमासी |न कळे अठरा पुराणांसी | ऐसे त्वा मजसी प्रजियेले ॥५॥
आता असोत बहुत बोलासी | शहाणे सितरले मानसी |तप्तलोहा उदक ग्रासी | तैसा होऊनि ठेलासी विष्णुदास नामयारे ॥६॥
