संगती बावनाचें रावलो
1776.
संगती बावनाचें रावलो सर्व भावे । चंदन होऊनी सवे ठेलो मी वो ॥१॥
वेधिला जीव माझा संतचरणी । आन दुजे मना नाठवेचि स्वप्नी ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्तीचा ठाव । अवघा देखे देवाधिदेव ॥३॥
पहाता पाहांता मन नाहीसे जाले । एका जनार्दनी केले मज ऐसे ॥४॥
