वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

पतिव्रते आनंद मनी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079934 · अभंग क्र. १७७२

1772.
पतिव्रते आनंद मनी । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनी ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भले जगी ॥धृपद॥
सुख पुराणी आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥
शूरा उल्हास अंगी । गांढया मरण ते प्रसंगी ॥३॥
शुद्ध सोने उजळे अगी । हीन काळे धावे रंगी ॥४॥
तुका म्हणे तोचि हिरा । घनघाये निवडे पुरा ॥५॥

अर्थ :
'व्यभिचार करणे वाईट आहे' असे ऐकताच जी पतिव्रता आहे ती मनापासून आनंदते परंतु शिंदळीच्या (व्यभिचारिण स्त्री) मनाला अशी वचने, असे शद्ब खोचक वाटतात आणि तिला ऐकताना देखील त्रास होतो. तसेच पुराणश्रवण करताना आचारशील व्यक्तीला सुख आणि समाधान लाभते परंतु दुराचारी व्यक्तीला ते दुःख देऊन जाते, त्यांचा जीव घुसमटतो. त्याप्रमाणेच शूर व्यक्ती रणांगण नजरेस पडताच उल्हसित होतो, त्याला रोमांच भरून येते परंतु फक्त शूर पणाच्या वार्ता करणाऱ्या पण मूळचा भित्र्या माणसाला मरण जवळ आल्यासारखे वाटते. शुद्ध सोने देखील आगीतून गेले असता उजळते परंतु हींन मिश्रित खोटा धातू काळवंडतो, त्याचे रूपच पालटते. तुकाराम महाराज म्हणतात नुसते खोटे शब्द आणि देखावा ह्यांना आग लागो, मनाचा शुद्धपणा हा खरा सर्वात भला. कारण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याची कसोटी घेतलीच जाते आणि मग खरे काय ते जगासमोर येतेच ज्याप्रमाणे खरा हिरा कितीही घाव घातले असता फुटत नाही, तो आहे तसाच अखंड राहतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग